बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डु प्लेसिस-ऋतुराजची धमाकेदार खेळी, चेन्नईने हैदराबादला नमवलं!

नवी दिल्ली | दिल्लीमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायजर्स हैदराबादवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. हैदराबादने चेन्नईला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान चेन्नईने 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं.

चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. तसेच फॅफ डु प्लेसिसने 56 धावा केल्या. हैदराबादकडून राशिद खानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले.

हैदराबादचा हा सहाव्या सामन्यातील पाचवा पराभव ठरल्यानं स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांना आता पुढील प्रत्येक सामना जिंकावा लागेल. वॉर्नरने 55 चेंडूत 3 फोर आणि 2 सिक्ससह 57 धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान वॉर्नरने झुंजार अर्धशतक लगावलं. या अर्धशतकासह वॉर्नर आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

वॉर्नरच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 50 वं अर्धशतक ठरलं. वॉर्नर आयपीएलमध्ये अर्धशतकांचं अर्धशतक लगावणारा पहिलाच बॅट्समन ठरला आहे. वॉर्नरने आपल्या खेळीदरम्यान सिक्स लगावले. या सिक्ससह वॉर्नर आयपीएलमध्ये 200 सिक्स लगावणारा एकूण 8 वा तर चौथा परदेशी फलंदाज ठरला.

थोडक्यात बातम्या- 

काळीज पिळवटून टाकणारी घटना; रुग्णालय मिळेना, चिमुकलीनं बापाच्या कुशीतच सोडला जीव !

धक्कादायक! भाजपच्या आणखी एका आमदाराचं कोरोनाने निधन

दिलेला शब्द पाळा, केंद्रावर जबाबदारी ढकलून चालणार नाही- पंकजा मुंडे

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

मन सुन्न करणारी घटना; पतीचा कोरोनामुळे मृत्यू, पत्नीने उचललं मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More