Top News खेळ

चेन्नईनं केली अशी करामत की पंजाबला व्हावं लागलं आयपीएलच्या बाहेर!

दुबई | आयपीएलच्या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात चेन्नईने सुपर किंग्जने 9 विकेट्स राखून किंग्ज इलेव्हेन पंजाबचा पराभव केलाय. या पराभवामुळे पंजाबला देखील या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे.

आजचा सामना पंजाबसाठी ‘करो या मरो’ स्थितीचा होता. पंजाबने प्रथन फलंदाजी करत 153 धावा केल्या. पंजाबकडून दीपक हुड्डाने 62 रन्सची अप्रतिम खेळी केली.

154 लक्ष्याचा पाठलाग करताना फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडने चांगला खेळ करत सुरुवात केली. मात्र अवघ्या 2 रन्ससाठी प्लेसिसचं अर्धशतक हुकलं. मात्र दुसऱ्या बाजूने पुण्याच्या गायकवाडने तिसरं अर्धशतक झळकावत चेन्नईला विजयाच्या पथावर आणलं.

आजचा सामना जिंकत प्ले ऑफमधून बाद झालेल्या चेन्नईने विजयाची हॅटट्रिक साजरी केली. मात्र मात्र पंजाबचं चे आव्हान संपुष्टात आणलं. नाबाद 62 रन्सची खेळी करणाऱ्या ऋतुराजला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या-

“काही कामं उरली नसल्याने नारायण राणे आता पुड्या सोडण्याचं काम करतात”

एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात; स्वतः ट्विट करून दिली माहिती

“….आणि साहेबांना घरी बसल्या दिल्लीची स्वप्न पडतायत”

“सिंधुदुर्गधील काही नेते जीडीपीबद्दल बोलतात, पण त्यांनी आधी जीडीपीचा फुल फॉर्म सांगावा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या