बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पायातून रक्त वाहत असताना देखील CSKचा ‘हा’ खेळाडू खेळतच राहिला, फोटो व्हायरल

नवी दिल्ली | आयपीएल 2021 चं दुसरं पर्व मोठ्या उत्साहात चालू आहे. सध्या आयपीएलच्या गुणतालिकेमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. नुकताच चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकत्ता नाईट रायडर्समध्ये अटीतटीचा सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईच्या संघाने कोलकत्याच्या संघावर दोन गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.

चेन्नई आणि कोलकत्ता दरम्यान झालेल्या या सामन्यात चेन्नईचा सलामीवीर फाफ डुप्लेसिस याने सर्वांचीच मने जिंकली. गुडघ्यातून रक्त येत असताना देखील डुप्लेसिसने मैदान सोडलं नाही. तो खेळतच राहिला. यामुळे या सामन्यानंतर सोशल मीडियावर फक्त डुप्लेसिसचीच चर्चा चालू आहे.

कोलकत्याचा संघ फलंदाजी करत असताना फाफने झेल घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याच्या पायाला चांगलीच दुखापत झाली. यानंतर तो मैदानाबाहेर गेला. परंतु काही वेळाने तो पुन्हा मैदानावर परतला. यावेळी त्याच्या जर्सीमधून गुडघ्यातून रक्त आलेलं स्पष्ट दिसत होतं.

गुडघ्याला एवढी दुखापत झाली असताना देखील तो क्षेत्ररक्षण करत राहिला. एवढंच नाही तर फाफ डुप्लेसिस फलंदाजी करण्यासाठी देखील मैदानावर आला. यावेळी त्याने 43 धाव केल्या आणि या सामन्यात चेन्नईच्या संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

थोडक्यात बातम्या –

HDFC बँकेचा मोठा निर्णय; ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीची संधी

काँग्रेसला दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला; राज्यसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार

धर्मांतराचं रॅकेट चालवणाऱ्या तरुणाला नाशिकमधून अटक; तपासात धक्कादायक माहिती समोर

बिकीनी घालून तरुणाचा भररस्त्यात भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

कोरोना लसीला विरोध करणाऱ्या ‘या’ माॅडेलची मृत्यूशी झूंज; लोकांना केलं लस घेण्याचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More