महाराष्ट्र वाशिम

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू; सर्व शाळा, महाविद्यालये बंद

Photo Courtesy- Pixabay

वाशिम | वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलनं, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका याठिकाणी केवळ 50 व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे.

5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच वाशिम जिल्ह्यातील सर्व धार्मिक संस्था, प्रार्थना स्थळे यांनी त्यांच्या धार्मिक संस्थानामध्ये, कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्यात.

सोशल डिस्टसिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक आहे. या नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ, चालू सामन्यात खेळाडूचा मृत्यु

‘पूजा अरूण राठोड’ नावाने यवतमाळ जिल्ह्यात गर्भपाताचा प्रकार!

पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन होणार का?; मुरलीधर मोहोळ म्हणाले…

बाबो! चालू मिटींगमध्ये बायकोला आवरला नाही नवऱ्याला किस करण्याचा मोह अन…; पाहा व्हिडीओ

शिवजयंती निमित्त खासदार अमोल कोल्हेंनी केला नवा संकल्प!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या