Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यापासून जवळ असलेल्या ‘या’ भागात उद्यापासून संचारबंदी

पुणे | कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलीस मास्क न वापरणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कडक कारवाई करत असल्याचं दिसत आहे. अशातच पुण्यातील आळंदी या भागात उद्यापासून संचारबंदी करण्यात आली आहे.

आषाढी आणि कार्तिकी वारीनंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन सोहळा असतो. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेत्र आंळदी येथे 6 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये संचारबंदी असणार आहे.

आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आणि कार्तिकी यात्रा येत्या 8 ते 14 डिसेंबरपर्यंत होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पिंपरीचे पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पंढरपूरहून आळंदीतील कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या श्री. पांडुरंग, संत नामदेव, संत पुंडलिक या तीन दिंड्यांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामध्ये एका पालखीसोबत 20 वारकऱ्यांना परवानगी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

लस हे अमृत नाही, जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत…- राजेश टोपे

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालांनंतर फडणवीसांचं सत्तास्थापनेबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले…

दुखापतीमुळे टी-20 मालिकेतून रवींद्र जडेजा बाहेर; ‘या’ मराठमोळ्या खेळाडूचा टीममध्ये समावेश

“शरद पवारांच्या वक्तव्याकडे वडिलकीचा सल्ला म्हणून पाहा”

1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होणार- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या