बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुन्हा संचारबंदीचे आदेश

अमरावती | त्रिपूरा येथील कथित हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील विविध भागात पाहायला मिळाले. त्यातच विदर्भातील अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करत असताना हिंसाचार व तोडफोड झाली. तसेच या तोडफोडीचं रूपांतर दंगलीत झालं. अमरावतीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर तिथे कलम 144 लागू करण्यात आलं होतं.

अमरावतीमध्ये जमावबंदी व संचारबंदीचे आदेश देऊन पोलिसांनी इंटरनेट सेवाही खंडीत केली होती. त्याचबरोबर हळूहळू परिस्थिती आटोक्यात आली असताना नागरिकांना निर्बंधांमधून शिथिलता देण्यात येत होती. परंतू, आता राजकीय पक्षांचे नेते पुन्हा एकदा आंदोलन करत असल्याने त्या आंदोलनाची प्रशासनाने धास्ती घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

अमरावती शहरात पुन्हा एकदा संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडी व भाजपच्या आंदोलनाची धास्ती घेत प्रशासनाने अमरावती शहरात संचारबंदीचे आदेश दिले आहेत, अशी चर्चा सध्या सुरू आहे. शिवाय आता नागरिकांना आणखी काही दिवस निर्बंधांमध्ये राहावं लागणार असल्याचं दिसून येत आहे.

नव्या नियमांनुसार आता अमरावती शहरात सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करून बाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सुधारित आदेश काढून स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी पोलिसांनी कंबर कसल्याचं अमरावतीमध्ये दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या

’75 वर्षात जितकी प्रगती करायला हवी होती तितकी…’, मोहन भागवतांनी केलं मोठं विधान

“राज्यातील वातावरण भाजपकडून गढुळ केलं जात आहे”

किरीट सोमय्या आज दिल्ली दौऱ्यावर, करणार ‘या’ नेत्यांच्या घोटाळ्याची चौकशी

कंगनाचं पुन्हा वादग्रस्त विधान; शीख समुदायाचा ओढवून घेतला रोष

मलिकांनी ट्विटरवर मध्यरात्री फोडला बाॅम्ब, समीर वानखेडेंचा ‘तो’ फोटो केला शेअर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More