बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ प्रमुख धार्मिक ठिकाणी संचारबंदी; गुलाल उधळणे, पेढे वाटण्यास सक्त मनाई

सातारा | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढतच असताना प्रशासन आणि राज्य सरकारकडून अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांना लागून असलेले शिवशंकर भक्तांचं श्रद्धास्थान शिखर शिंगणापूर येथे आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील दहिवडीचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी याबाबत माहिती दिली आहे. शिखर शिंगणापूर येथे महाशिवरात्रीला दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. आणि यावर्षी गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

सलग 3 दिवस शिखर शिंगणापूर येथे महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच याचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे नोव्हेंबरपर्यंत हे मंदिर बंद होते. त्यानंतर कोरोना आटोक्यात आला असताना पुन्हा मंदिराचे द्वार भक्तांसाठी खुले करण्यात आले होते. पण, आता मात्र पुन्हा राज्यभरात कोरोना डोकं वर काढत असताना पाहायला मिळत असल्याने प्रशासनाकडून कठोर पाऊले उचलण्यात येत आहे.

शिखर शिंगणापूर, वावरहिरे, मोही, डांगीरेवाडी या गावातील मंदिरातही कलम 144 म्हणजेच जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर आणि गुलाल उधळणे, पेढे वाटणे, फटाके फोडणे इत्यादींवर बंदी घालण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

ममता बॅनर्जींच्या पायाला गंभीर दुखापत; तर प्रशांत किशोर सोशल मीडियात ट्रेंडमध्ये

आमदार निधीत एवढ्या कोटींची वाढ; अजित पवारांची मोठी घोषणा!

महाराष्ट्रातील ‘या’ शहरांची चिंता वाढली; आजपासून कठोर निर्बंध

धक्कादायक! रागाच्या भरात डिलिव्हरी बॉयनं फोडलं तरुणीचं नाक, कारण ऐकून तुम्हाही व्हाल हैराण

राज्यात कोरोनाचा उद्रेक; आजची आकडेवारीही अत्यंत धक्कादायक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More