बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सध्या…,’ निती आयोगाचा गंभीर इशारा

नवी दिल्ली | देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने (Corona virus) हाहाकार माजवला आहे. त्यामुळे आता देशात लवकरच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संक्रमणाचा प्रसार दर्शविणारं आर व्हॅल्यू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1.69 वर होते, ते आता 2.67 वर पोहोचली आहे.

सध्या कोरोना ही वेगाने पसरणारी महामारी आहे. आर नॉट व्हॅल्यू 2.69 आहे. कोरोनाची दुसरी लाट पीकवर असताना हे केवळ 1.69 होतं. त्यामुळे तुलनेनं ही संख्या खूप जास्त आहे, असं निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेच्या तुलनेत जास्त रुग्ण आढळण्याची शक्यता आहे.

30 डिसेंबर रोजी केस पॉझिटिव्ह रेट 1.1 टक्के होता आणि दुसऱ्या दिवशी तो 1.3 टक्के होता. आता देशात 5 टक्के पॉझिटिव्हीटी रेट नोंदवला जात आहे. त्याचप्रमाणे 30 डिसेंबरला करोना बाधितांची संख्या 13 हजार होती, ती मंगळवारी 58 हजारांवर पोहोचली आहे, अशीही माहिती पॉल यांनी दिली आहे.

दरम्यान, भारतीय वैध्यकिय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनीही कोरोनाबाबत इशारा दिला आहे. शहरांमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये मोठी वाढ होतं आहे. त्यातचं ओमिक्रॉन या प्रकरणामुळे तर ही वाढ अधिकचं प्रमाणात होत आहे. त्यामुळे गर्दी टाळायचलाचं हवी, असं भार्गव यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘त्या लोकांना पंतप्रधानांच्या गाडीपर्यंत कोणी पोहचवलं?’, स्मृती इराणींचे काँग्रेसवर गंभीर आरोप

“… मी जिवंत पोहचू शकलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा”

धक्कादायक! संजय राऊतांच्या घरी कोरोनाचा शिरकाव, चार जणांना कोरोनाची लागण

पुढील चार दिवस जोरदार पाऊस; ‘या’ भागात अलर्ट जारी

मोठी बातमी! राज्यातील सर्व महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More