बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हार्दिक पांड्याच्या अडचणी वाढल्या; कस्टम विभागाकडून मोठी कारवाई

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्या याला कस्टम विभागाने मोठा दणका दिला आहे. खराब कामगिरीमुळे हार्दिक पांड्याला आधीच संघातून वगळण्यात आलं त्यात कस्टम विभागाने केलेल्या मोठ्या कारवाईमुळे हार्दिक पांड्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कस्टम विभागाकडून हार्दिक पांड्याविरोधात जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचं युएईमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची आणि हार्दिक पांड्याची कामगिरीही उल्लेखनीय नव्हती. त्यामुळे न्युझीलंड विरूद्धच्या टी-20I सामन्यांमधून हार्दिक पांड्याचं नाव वगळण्यात आलं. त्यात युएईवरून मुंबईला परतल्यावर विमानतळावरच कस्टम विभागाने जप्तीची कारवाई केली.

युएईमधून परतल्यावर कस्टम विभागाने विमानतळावर हार्दिक पांड्याला थांबवलं आणि त्याच्याकडून दोन महागडी घड्याळं जप्त केली. या दोन घड्याळांची किंमत तब्बल 5 कोटी रूपये इतकी आहे. हार्दिक पांड्याला सुरूवातीपासून महागड्या घड्याळांची आवड आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या आणि दुर्मिळ घड्याळांचं देखील कलेक्शन आहे.

युएईवरून परत येताना हार्दिक पांड्याने या दोन महागड्या घड्याळांविषयी कस्टम विभागाला माहिती दिली नव्हती. त्यात हार्दिक पांड्या जवळ या दोन्ही घड्याळांची पावती देखील नव्हती. त्यामुळे हार्दिक पांड्याविरोधात ही जप्तीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

एनसीबीची मोठी कारवाई! 1127 किलो गांजा ‘या’ ठिकाणाहून केला जप्त

एकीकडे संप सुरू, तर दुसरीकडे 6800 कर्मचारी कामावर परतले?

आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी वाढल्या, कधीही होऊ शकते अटक

‘तुम्ही आधी तुरूंगातील जेवण घ्या’; अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका

‘हे’ राज्य पुन्हा एकदा लाॅकडाऊनसाठी सज्ज, न्यायालयात स्पष्ट केली भूमिका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More