बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, म्हणाले ‘बँक बुडाल्यास ठेवीदारांना…’

नवी दिल्ली | देशातील अनेक बॅंका दिवाळखोरीत निघाल्यानंतर त्या बॅंकेतील सामान्य ग्राहकांचे पैसे परत करण्यासाठी सरकार काहीच करत नाही अशी कामयची ओरड होती. मोदी सरकार सध्या देशातील बॅंकींग प्रणाली अधिक चांगल्या पद्धतीची करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅंकेच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ‘ठेवीदार प्रथम – गॅरंटीड टाईमबाऊंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट रु. या विषयावर नागरिकांना संबोधित केलं आहे. त्यांनी  यावेळी एक  योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत आता बॅंक अडचणीत आल्यावर ग्राहकाला त्याची रक्कम 90 दिवसांच्या आत देणं बंधनकारक असणार आहे. परिणामी या घोषणेमुळं अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य झाली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास 1 लाख ग्राहकांचे पैसे परत करण्यात आले आहेत. ही रक्कम तब्बल 1300 कोटी रूपये इतकी असल्याची माहिती मोदी यांनी दिली आहे. मोदी यांनी या योजनेची माहिती देताना आधिच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. अशी रक्कम काढायला वर्षानूवर्ष लागायची पण आता अवघ्या 90 दिवसात तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार, असं मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान, सध्या कोणतीही बॅंक अडचणीत असुद्या ठेवीदाराला 5 लाख रूपये तर नक्की मिळतील. यामध्ये सुमारे 98 टक्के खात्यांचा समावेश आहे. आतापर्यंत आपल्या देशात अनेक बॅंक घोटाळे झाले आहेत. परिणामी सामान्य नागरिकांचा मेहनतीचा पैसा अडकुन पडत होता.

थोडक्यात बातम्या 

“संजय राऊत नक्की शिवसेनेचे आहेत की राष्ट्रावादीचे?”

‘…तर आज युती तुटली नसती’; संजय राऊतांचा भाजप नेत्यांना टोला

“शरद पवार म्हणजे पाॅवर हाऊस नेते, त्यांचा नेम अचुक असतो”

“26 खासदार असणारा गुजराती पंतप्रधान होतो मग 48 खासदार असणारा महाराजांचा मावळा…”

“बॅचलर राहु नका, घरात बायको असली की माणसाचं डोक शांत राहतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More