बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ची मोठी कारवाई; ग्राहकांना ‘इतकेच’ पैसे काढता येणार

अहमदनगर | रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने अनेक बँकाविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. RBI ने महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर निर्बंध आणत मोठा दणका दिला आहे. अहमदनगरमधील एका सहकारी बँकेवर RBI ने अनेक निर्बंध लादले आहेत.अहमदनगर येथील म्युनिसिपल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व बँकेने कारवाई केली आहे.

अहमदनगर सहकारी बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याची माहिती मिळाल्यानंतर रिझर्व बँकेने (Reserve Bank Of India) ‘बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949’ अंतर्गत ही कारवाई केली आहे. रिझर्व बँकेच्या या निर्बंधामुळे ग्राहकांना बचत खात्यातील (Saving Account) किंवा चालू खात्यातील (Current Account) एकुण रकमेपैकी 10 हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

RBIच्या परवानगी शिवाय अहमदनगर सहकारी बँक कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण किंवा पेमेंट करू शकत नाही आणि कोणतेही नवे कर्जही देऊ शकत नाही. RBI कडून सूचना मिळत नाही तोपर्यंत बँक कोणत्याही मालमत्तेची विल्हेवाट लावू शकत नाही. या सहकारी बँकेला कोणतेही दायित्व पूर्ण करता येणार नाही किंवा कोणती गुंतवणूकही करता येणार नाही.

नगर सहकारी बँकेवरील निर्बंध 6 डिसेंबरपासून ते पुढील 6 महिन्यांसाठी लागू राहाणार आहेत. या निर्बंधांचा अर्थ बँकेचा परवाना रद्द केला असा होत नसल्याचं RBIने स्पष्टं केलं आहे. भविष्यात आर्थिक परिस्थिती बघता काही निर्बंध शिथीलही केले जाऊ शकतात असंही RBIने स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More