बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सब गोलमाल है! मी कट-कमिशन खाल्लं तर बुडबुड घागरी”

मुंबई | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली आहे. महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने खड्ड्यांची दुरुस्ती आणि उपाययोजणांची बैठक घेत कंत्राटदारांना रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेवरुन चांगलंच सुनावलं आहे.

अशातच आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी याच मुद्यावरुन सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं आहे. कट कमिशन खाल्ले तरी बुडबुड घागरी, असं म्हणत शेलारांनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. नुकतेच त्यांनी यासंबंधित ट्वीट केले आहेत.

पालिका पोर्टल फक्त 927 खड्डे असल्याचं सांगतंय. तर दुसरीकडे 42 हजार खड्यांचा दावा केला जातोय. 48 कोटींचा निधी येऊन देखील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. कंत्राटदारांवर कारवाई करा म्हणायचं आणि पाठीमागच्या बाजूने कट कमिशन खायचं, सब गोलमाल है, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

तसेच गेल्या 24 वर्षात 21 हजार कोटी खड्ड्यात घातले. आता धावते दौरे करुन कारवाईचा आरडाओरडा करुन काय सांगायचं आहे? मी कट कमिशन खाल्ले तरी बुडबुड घागरी. तेच कंत्राटदार, त्याच निविदा, तिच थूकपट्टी,  कसं पटणार मुंबईकरांना, खड्यांनी पितळ उघडं केलं, असा देखील शेलार यांनी म्हटलं आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या –

“पालकमंत्री जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झालेत”

अंगणात दबा धरून बसला बिबट्या, अचानक महिला समोर आली अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

ठाकरे सरकार अॅक्शन मोडमध्ये; ‘त्या’ कंत्राटदारांवर करणार तात्काळ कारवाई

“मी कधीच ‘भाई युनिव्हर्सिटी’चा विद्यार्थी नव्हतो, ना कधी युनिव्हर्सिटीत गेलो”

लांच्छनास्पद! महात्मा फुलेंचं नाव असलेल्या विद्यालयात फीसाठी विद्यार्थ्याला मारहाण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More