बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निर्बंध असतानाही कटिंगचं दुकान सुरू; पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून व्यावसायिकाचा मृत्यू

औरंगाबाद | महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री 8 वाजल्यापासून पुढचे 15 दिवस राज्यात कडक संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती.

मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे फक्त अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती पण या नियमांचं उल्लंघन करून एका सलून व्यावसायिकाने औरंगाबादमध्ये आपलं दुकान उघडलं, दुकान उघडण्याची माहिती मिळताच पोलिसांनी उस्मानपुरा भागातील सलूनमध्ये पोहोचून सलून मालकाला प्रचंड मारहाण केली.

पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून मालकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच उस्मानपूऱ्यातील पोलीस ठाण्याबाहेर नातेवाईकांनी मृतदेह घेऊन आंदोलनही केलं. शेवटी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांना या प्रकरणात मध्यस्थी करावी लागली.

पोलीस आयुक्तांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन पोलिस कर्मचारी आणि पोलिस निरीक्षकांना कडक सूचना देण्यात आल्या असून मृत व्यक्तीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन मृताच्या नातेवाईकांना त्यांनी दिलं आहे. या प्रकरणात नातेवाईकांनी प्रचंड गोंधळ घालत हत्या करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी केली व काही वेळानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

थोडक्यात बातम्या

‘राज्य सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करतंय’; पुण्याच्या महापौरांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

संचारबंदीकाळात नागरिकांना प्रवासासाठी पास लागणार का? पोलीस महासंचालकांनी दिलं उत्तर…

ब्रीच कँडी रुग्णालयाच्या गेटवरून सुप्रिया सुळेंची ऑनलाईन सभा

बहुजन समाजाला वाहिलेली पहिली ई-कॉमर्स वेबसाईट सुरु, अनोख्या प्रयोगाला हवी तुमची साथ

धक्कादायक! शेजारी राहणाऱ्या जोडप्याने पाळीव कुत्र्याचे चक्क गुप्तांग कापले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More