बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शितल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यास सायबर तज्ज्ञांना अपयश; आत्महत्येमागचं गुढ कायम

चंद्रपूर | समाजसेवक बाबा आमटे यांची नात डाॅ. शीतल आमटे यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली होती. त्या महारोगी सेवा प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देखील राहिल्या होत्या. त्यांच्या आत्महत्येला 4 महिने पुर्ण झाले तरी पोलिसांना या आत्महत्येतील गुंता सोडवण्यात यश आलं नाही. विशेष म्हणजे त्यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यात सायबर तज्ज्ञांना देखील अपयश आलं आहे.

मागील वर्षी 30 नोव्हेंबर रोजी डाॅ.शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन टोचून आयुष्य संपवलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कसून चौकशी केली होती. तपासात पोलिसांनी त्यांच्या इलेक्ट्राॅनिक वस्तू ताब्यात घेतल्या होत्या. त्यात 2 मोबाईल, लॅपटाॅप आणि टॅब जप्त करण्यात आले होते. परंतू पुढे तपास करत असताना मुंबई पोलिसांच्या सायबर टीमला टॅबचा पासवर्ड शोधता आला नाही. शीतल आमटे यांनी त्यांच्या टॅबला EYE पासवर्ड ठेवला होता.

सायबर टीमला टॅबचा पासवर्ड शोधता आलं नसल्यानं आता या इलेक्ट्राॅनिक वस्तू पुण्याच्या सेंट्रल फाॅरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आल्या आहेत. या टॅबमधील माहितीच्या आधारे पोलिसांना या आत्महत्येमागील गुंता सोडवण्यास मदत होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 2 मोबाईल आणि लॅपटाॅप यांच्यातील डेटा पुर्णपणे काढला गेला नसल्याची शंका पोलिसांना आहे. त्यामुळे मोबाईल आणि लॅपटाॅपचीही पुन्हा पडताळणी करण्यात येऊ शकते.

दरम्यान, शीतल आमटे यांनी घेतलेल्या विषारी रसायनाबद्दल आणखी तपास पूर्ण झालेला नाही. तर पोलीस अजूनही रासायनिक रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत. तर शीतल आमटे यांनी नैैराश्यातून आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. परंतू तपासात होत असलेल्या दिरंगाईमुळे शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं गुढ कायम राहिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

धाडसी अंगरक्षकाने पोलीस अधीक्षकांवर होणारा तलवारीचा वार अंगावर झेलला!

“पवार साहेब, शेतकरी विरोधात काम करणाऱ्या मंत्र्यांना हटवा, वेळ मिळाल्यास आमच्याकडेही लक्ष द्या”

वडिलांनी घर विकून शिकवलं; पोरानं पहिल्या प्रयत्नातच केली UPSC ची परीक्षा क्रॅक

31 मार्चपर्यंत करून घ्या ‘हे’ महत्वाचं काम अन्यथा तुमचं पॅनकार्ड होऊ शकतं रद्द!

लोकांच्या विरोधानंतरही सरकार लॉकडाऊन लावणार? राजेश टोपे म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More