बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद उपक्रम! असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत सायकल वाटप

पिंपरी | कोविड-19 या साथीच्या रोगामुळे टाळेबंदीमुळे हाताचे काम गेले आणी जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे आपण हळूहळू पूर्वपदाकडे येण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. सध्या कामगाराना कामावर जाण्यासाठी वाहन उपलब्ध नाही, दुचाकी वापरु शकत नाही अशा स्थितीत कष्टक-याना दिलासा म्हणून विविध संस्थातर्फे आज पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हार्डीकर यांचे हस्ते सायकल चे वाटप करण्यात आले. यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे काशिनाथ नखाते, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, नगरसेवक एकनाथ पवार ,अभिजीत कुपटे ,सुनील पाटील, सतेज नाझरे, विनीत पाटील, माधुरी जलमुलवार, राजेश माने आदी उपस्थित होते. यावेळी स्वच्छता कामगार ,फेरीवाला, घरेलू कामगार, कंत्राटी कामगार, बांधकाम कामगार यांना सायकलींचे वितरण करण्यात आले प्रातिनिधिक स्वरूपात दोन महिन्याच्या कालावधीसाठी 15 सायकलींचे मोफत वितरण करण्यात आले.

टाळेबंदीतून पुर्वपदावर येत असताना हाताला काम मिळत असताना कामावर पोहोचायला, कामावरून परतायला सायकल ही विनाइंधन, वाहतूक कोंडीवर उत्तम उपाय, पर्यावरणपूरक तसेच वैयक्तिक व सामाजिक आरोग्यास उपयुक्त आहे. म्हणून इतर देशाप्रमाने अपल्याकडेही सायकला चा वापर वाढवा असे मत व्यक्त करत आयुक्त श्रावण हार्डीकर या उपक्रमाचे स्वागत केले. कोव्हीडचे सोशल डिस्टन्सिंग निकष पाळत सायकल कामावर पोहोचण्यास उत्तम उपाय व भुमिका ठरणार आहे. इच्छितस्थळी जाणे आणि या सायकलिंना आधुनिक पद्धतीचे लॉक असल्यामुळे सायकली सुरक्षित रहाणार आहेत. शिवाय सायकलींचे स्यानीटाजेशन, देखभाल दुरुस्ती सदर काळात सायकल पुरवठादारच करणार आहेत.

सायलटूवर्क, सायकल अवेअरनेस पुणे , निसर्ग सायकल मित्र, मित्र परिवार, भद्रायराजते प्रतिष्ठाण, ग्रीन सायकल क्लब, युलू बाईक्स व कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य तसेच सायकल महापौर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्वावर कष्टकरी तसेच या कोव्हीड योध्यांना मोफत सायकल प्रदान उपक्रम आज राबविण्यात आला.

प्रवासासाठी असंख्य अडचणी होत्या मात्र सायकली मिळाल्याने यावेळी कष्टकरी कामगारानी आनंद व्यक्त केला. आगामी काळात आम्ही शक्य तितक्या सायकली विविध सामाजिक संस्था, एनजीओ व सायकल कंपन्या यांच्या माध्यमातून विनामोबदला पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा व प्रयत्न करणार आहोत.

ट्रेंडिंग बातम्या-

…तर आळंदीत लग्न करता येणार नाही; ही अट पूर्ण करावी लागणार!

लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढणार?, मात्र ही क्षेत्रं घेऊ शकतात मोकळा श्वास

महत्वाच्या बातम्या-

सचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार

कोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी

‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More