देश

अम्फान वादळाचा फटका, पंतप्रधानांकडून पश्चिम बंगालसाठी ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर

कोलकाता | पश्चिम बंगाल आणि ओदिशा येथे अम्फान चक्रीवादळाने अतोनात नुकसान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे नुकसान पाहणी दौरा केला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालला तात्काळ एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

अम्फान चक्रीवादळामुळे जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत केंद्र सरकार करेल, असंही पंतप्रधानांनी जाहीर केलं.

पीएम नरेंद्र मोदी यांच्या घोषणेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भडकल्या आहेत. त्यांच्यामते, नुकसान 1 लाख कोटीचं झालं आहे आणि पॅकेज फक्त 1 हजार कोटीचं देण्यात येत आहे.

अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये थैमान घातलं आहे. आतापर्यंत या चक्रीवादळामुळे 80 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोटी रुपयांचं आतापर्यंत नुकसान झालं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुंबईतले ठाकरे-फाकरे काही करु शकले नाही, नगरच्या कोपऱ्यात बसून माझं काय करणार- निलेश राणे

राज्याला आज नाटकाची नाही तर सहकार्याची गरज आहे- रोहित पवार

महत्वाच्या बातम्या-

खासगी रुग्णालयात होणारी रुग्णांची लूटमार थांबवण्यासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

“घराचं रणांगण फक्त कौरवांनी केलं होतं आणि आज भाजपने”

कोरोनाबाबत शासनानं काहीच न करता विरोधकांना सहकार्य करायला सांगणं चुकीचं- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या