Cyclone Remal | बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर उद्या 26 मे सायंकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळाच्या रूपात पोहोचेल. महाराष्ट्रासह देशभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला असतानाच आता रेमल चक्रीवादळचं नवीन संकट उभं राहिलं आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रविवारी सायंकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळाच्या रुपात पोहोचेल.
‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
रविवारी हे चक्रीवादळ ताशी 102 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता असून पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये 26 आणि 27 मे रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
त्यामुळे 27 मेपर्यंत मच्छिमारांना किनारपट्टीवर परत जाण्याचा आणि बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. कमी दाबाच्या प्रणालीचे चक्रीवादळमध्ये रूपांतर होण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान हे 27 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे असते. बंगालच्या उपसागरातील समुद्राच्या (Cyclone Remal) पृष्ठभागाचे तापमान सध्या 30 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.
हिंद महासागरातील चक्रीवादळांच्या नावाच्या प्रणालीनुसार या चक्रीवादळाला ‘रेमल’ असं नाव देण्यात आलंय. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरासह उत्तर हिंद महासागरात तयार होणाऱ्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळांसाठी मानक नामकरण पद्धती वापरली जाते.
महाराष्ट्रावर काय परिणाम होईल?
‘रेमल’ हे नाव ओमानने सुचवले असून अरबी भाषेत त्याचा अर्थ ‘वाळू’ असा होतो. या चक्रीवादळमुळे पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरमध्ये (Cyclone Remal) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, महाराष्ट्रावर याचा काहीच परिणाम होणार नसल्याचं हवामान विभागाने म्हटलंय.
News Title : Cyclone Remal will hit in 48 hours
महत्त्वाच्या बातम्या-
“कायदा आणि नियम फक्त सामान्य माणसांना छळण्यासाठी आहेत काय?”
शिखर धवन ‘या’ महिला क्रिकेटरशी करणार दुसऱ्यांदा लग्न?; स्वतःच केला मोठा खुलासा
ग्राहकांनो खरेदीची करा घाई! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर
मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, ‘या’ लिंकवर पाहा गुण
बायकोमुळे हार्दिक पांड्या कंगाल होणार?, सोशल मीडियावर एका गोष्टीची जोरदार चर्चा