मुंबई | लालबागमध्ये साराभाई इमारतीतील बंद खोलीला आज सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचं समजतंय.
सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडलीये. या दुर्घटनेत 16 जण जखमी झालेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या 12 जणांवर केईएम रूग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 4 जणांना ग्लोबल रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.
गेल्या दिवसापासून या खोलीमध्ये गॅस लीकेजचा वास येत होता. दरम्यान वास कुठून येतोय हे पाहण्यासाठी स्थानिक गेले असता अचानक स्फोट झाला. सुदैवाने कोणताही जीवितहानी झाली नाही.
महत्वाच्या बातम्या-
“मुख्यमंत्री महोदय, डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित करा”
रेखा जरे हत्याकांडप्रकरणी महत्त्वाची घडामोड; आता ही व्यक्ती चौकशीच्या फेऱ्यात
दिल जीत लिया दिलजीत!; शेतकऱ्यांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी दिले 1 कोटी
“मंत्रिपद गेलं तरी चालेल, ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू”
नो मराठी… नो ॲमेझॉन; ॲमेझॉनविरोधात मनसेची नवी मोहीम