सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट!

DA DR | गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या वेतनाबाबत तसेच निवृत्त वेतनधारकांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. संध्याकाळी केंद्रीय मंत्रीमंडळात याविषयीचा बैठकीमध्ये महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. (DA DR)

महागाई भत्त्याबाबत माहिती

आता आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. अद्यापही तारीख समोर आली नसली तरीही सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्यासोबतच पेन्शनधारकांनाही लॉटरी लागू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार Cabinet (CCEA) मध्ये भत्ता 4 टक्के वाढला जाऊ शकतो, असा मुद्दा मांडण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. (DA DR)

1 जानेवारी 2024 पासून हा भत्ता लागू होईल. कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचा वाढीव भत्ता पगारामध्येच जोडून येण्याची शक्यता आहे. भत्ता आणि महागाईपासून 50 टक्के दिलासा होईल.

केंद्र सरकार औद्योगिक कामगारांसाठी महागाई भत्ता सीपीआयच्या आकडेवारीतून निश्चित करते. सध्याच्या स्थितीत सीपीआय डेटा 12 महिन्यांच्या सरासरी 392.83 वर आहे. त्याच्या आधारावर डीए मुळ वेतनाच्या 50.26 टक्के होईल.

DA आणि DR फरक (DA DR)

DA आणि DR मधील अजूनही काही लोकांना फरक माहिती नाही. DA आणि DR हे खासकरून जानेवारी आणि जुलैमध्ये दोनदा वाढवण्यात येतात. यामध्ये शेवटची वाढ ही 2023 वर्षातील ऑक्टोबर महिन्यात करण्यात आली आहे. DA 4 टक्क्यांनी वाढवून 46 टक्के करण्यात आला होता. मार्च महिन्यात डीए वाढविण्याची घोषणा झाली तर तो या जानेवारीपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना उर्वरीत शिल्लक वेतनही मिळेल.

फायदा मिळण्याची संधी

53,500 रूपये महिना वेतन आहे तर त्या हिशोबाने 46 टक्के महागाई भत्ता 24,610 रूपये होईल. त्यामध्ये जर  डिएमध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्यास डिए 50 टक्क्यांवर जाईल. ही रक्कम वाढून 26,750 रूपये होईल.

News Title – Da Dr News Update 

महत्त्वाच्या बातम्या

सत्ताधारी आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?, जाणून घ्या संपूर्ण विधी

‘तो माणूस फडणवीसांचा….’; जरांगे पाटलांनी केला मोठा गौप्यस्फोट

अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर!

चिकन प्रेमींनो सावधान; ‘या’ शहरात ‘बर्ड फ्लू’चा उद्रेक