मोदी सरकारकडून कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट!

DA Hike 2024 | केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी म्हणजेच आज 16 ऑक्टोबररोजी महागाई भत्ता (डीए) जारी करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे. केंद्राने ग्रीन सिग्नल देताच सर्व राज्यांमध्येही महागाई भत्ता वाढीचा निर्णय जाहीर होणार आहे. (DA Hike 2024)

डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत काही मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा अद्याप होणे बाकी आहे.  यासोबतच कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकी देण्याची घोषणाही केंद्रीय मंत्रिमंडळाने केली. यंदा जानेवारीत 4 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. तर आज झालेल्या बैठकीत जुलैसाठी डीए वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

देशातील सर्व राज्यांमध्येही महागाई भत्ता वाढीचा निर्णय

सरकारने विधानसभा निवडणुकीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. आता महागाई भत्त्यातील वाढ दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 30 जून 2024 या कालावधीतील थकबाकीसह जुलै 2024 महिन्याच्या वेतनासोबत देण्यात येईल.  (DA Hike 2024)

देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. हा निर्णय दिवाळीच्या सणापूर्वी एक महत्त्वाचा दिलासा मानला जात आहे. देशातील 1 कोटींहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या दरवाढीचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची थकबाकी मिळेल.

‘असा’ वाढणार पगार

या निर्णयानंतर समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 40 हजार रुपये असेल तर डीएमध्ये 3 टक्के वाढ झाल्यानंतर त्याच्या पगारात 1,200 रुपयांची वाढ होईल. म्हणजे मूळ वेतन, महागाई भत्ता आणि एचआरए जोडण्याआधी त्याचा पगार 60 हजार रुपये होता, तर आता तो 61,200 रुपये होईल. (DA Hike 2024)

News Title :  DA Hike 2024

महत्वाच्या बातम्या-

एआर रहमानचा साऊंड असलेल्या महिंद्राच्या ”या’ भन्नाट कारची फीचर्स जाणून घ्या!

….अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार!

World Food Day! महाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्य पदार्थ तुम्हाला माहितेय का?

बाबा सिद्दीकी नाहीतर सलमान खान होता टार्गेटवर?, ‘त्या’ खुलाशाने सगळीकडे खळबळ

माजी खासदाराच्या पुतण्याने केली आत्महत्या!