DA Hike | देशातील सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी महागाई भत्ता (डीए) जारी करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिलीये. यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
केंद्राकडून ग्रीन सिग्नल मिळताच देशातील सर्व राज्यांमध्येही महागाई भत्ता वाढीचा निर्णय जाहीर होणार आहे. डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यासोबतच कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकी देण्याची घोषणाही केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे.
कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज
25 ऑक्टोबरपर्यंत केंद्र सरकार महागाई भत्त्याच्या वाढीची घोषणा करू शकते. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी प्लान तयार केला आहे. केंद्रीय कर्मचारी दीर्घकाळापासून मगागाई भत्त्यात वाढ व्हावी, याची वाट पाहत आहेत.
या निर्णयानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल. दरम्यान, कर्मचाऱ्यांना येत्या काही महिन्यांत केवळ वाढीव पगार मिळणार नाही तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांची थकबाकीही मिळण्याची शक्यता आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 40 हजार रुपये असेल आणि त्याच्या डीएमध्ये 3 टक्के वाढ होणार आहे. म्हणजे त्याच्या पगारात 1,200 रुपयांची वाढ होईल. म्हणजे मूळ वेतन, महागाई भत्ता आणि एचआरए जोडण्याआधी त्याचा पगार 60 हजार रुपये होता, तर आता तो 61,200 रुपये होईल.
केंद्र सरकारकडून केंद्राच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये दोनदा वाढ करण्यात येते. याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं होतं. केंद्र सरकारनं महागाई भत्ता वाढवल्यानंतर राज्य सरकारांकडून देखील त्यांच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली जाते. केंद्राच्या निर्णयानंतर इतर कोणती राज्य असा निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एआर रहमानचा साऊंड असलेल्या महिंद्राच्या ”या’ भन्नाट कारची फीचर्स जाणून घ्या!
….अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार!
World Food Day! महाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्य पदार्थ तुम्हाला माहितेय का?
बाबा सिद्दीकी नाहीतर सलमान खान होता टार्गेटवर?, ‘त्या’ खुलाशाने सगळीकडे खळबळ