बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; महागाई भत्ता तब्बल 11 टक्क्यांनी वाढला

नवी दिल्ली | भारत सरकारने गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याला अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. गेल्या वर्षभरात तीन वेळा महागाई भत्ता मिळण्यापासून केंद्रीय कर्मचारी वंचित राहिले होते. परंतु आता एक जुलै पासून सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता हा 11 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 17 टक्के महागाई भत्ता म्हणजेच डीए मिळत होता. आता या महागाई भत्त्यामध्ये 11 टक्क्यांची वाढ करून तब्बल 28 टक्के महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कोरोनामुळे सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा महागाई भत्ता रोखला होता. दरम्यान अर्थमंत्रालयाने जून 2021 पर्यंत महागाई भत्ता वाढवून देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे. महागाई भत्ता म्हणजे देशातील महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार कर्मचाऱ्यांना भत्ता देत असते.

सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह निवृत्त कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता केंद्र सरकारकडून दिला जातो. आर्थिक व्यवहार यासंबंधीच्या कॅबिनेट समितीने महागाई भत्ता वाढविण्यास मंजुरी दिल्याने आता केंद्रीय कर्मचाऱ्याना वाढीव महागाई भत्ता मिळणार असल्याचे निश्चित झालं आहे.

 

थोडक्यात बातम्या –

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More