बाबो! सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाला झाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा खर्च

मुंबई | बाॅलिवूडमधील(Bollywood) लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे सिद्धार्थ-कियारा(Sidharth Malhotra-Kiara Advani) आहेत. कित्येक दिवसांच्या रिलेशननंतर अखेर मंगळवारी सिद्धार्थ-कियारानं लग्नगाठ बांधली.

सिद्धार्थ-कियारा राजस्थानमधील जैसलमेर येथील सुर्यगढ पॅलेसमध्ये विवाहबद्ध झाले. सुर्यगढ पॅलेस हे बाॅलिवूड आणि हाॅलिवूड कलाकारांचे पसंतीचे ठिकाण मानले जाते. तसेच महागडे ठिकाण म्हणूनही सुर्यगढ पॅलेसची ओळख आहे.

या पॅलेसचे एका दिवसाचे भाडे १. ५ कोटी आहे. पीक टुरिस्ट सीझनमध्ये या पॅलेसचे एका दिवसासाठी २ कोटीही घेतले जाऊ शकतात. सिद्धार्थ-कियारानं या पॅलेसची बुकींग तीन दिवसांसाठी केली होती.

तसेच कियारानं लग्नात घातलेल्या दागिन्यांची किंमतही कोटींमध्ये आहे. सिद्धार्थनं लग्नात परिधान केलेली शेरवानीसुद्धा अत्यंत महागडी आहे. त्यामुळं सिद्धार्थ-कियाराचं लग्न हे महागड्या लग्नांपैकी एक ठरत आहे.

दरम्यान, सध्या सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. नेटकरी कमेंट्सच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More