बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाबा माझे कपडे फाटलेत…”,बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी दीड वर्षांनंतर परिवाराला भेटली

जळगाव | जळगाव येथे काळजाला चटका लावणारी घटना घडली आहे. या घटनेमध्ये एक अल्पवयीन मुलगी दीड वर्षांपुर्वी बेपत्ता झाली होती. मात्र दीड वर्षांनंतर तिने तिच्या आजोबांना फोन करुन तिचा पत्ता सांगितला. यावेळी तिने जे काही सांगितलं त्यानं कोणाच्याही अंगावर काटा येईल. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित आजोबांचे नाव भिमसिंग गंगाराम कोळी असं आहे. भिमसिंग हे 61 वर्षांचे असून ते आपल्या पत्नी आणि नातीसोबत यावलमधील धोबीपाडा येथील रहिवासी आहेत. 19 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांची 11 वर्षांची नात सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत गेली होती. यावेळी ती वर्गात दप्तर ठेवल्यानंतर काही कामानिमित्त बाहेर आली होती. तेव्हाच एका अनोळखी व्यक्तीनं तिला रिक्षात बसवून तिचं अपहरण केलं होतं.

मुलीचा शोध घेताना जळगावमध्ये रहिवासी असणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या आईकडे देखील चौकशी करण्यात आली होती. मात्र तिची आई देखील बेपत्ता असल्याचं समजलं. 24 एप्रिल रोजी बेपत्ता झालेल्या मुलीनं आपल्या आजोबांना संपर्क साधला. यावेळी तिनं आपण उत्तर प्रदेशातील एका गावात असल्याची माहिती दिली. तसेच आईचं पाच-सहा दिवसांपूर्वी निधन झालं असून बाबा माझे कपडे फाटले आहेत, मला चप्पलही नाही, तुम्ही मला कपडे आणि चप्पल पाठवा ना, अशा शब्दात मुलीने आपल्या आजोबांना फोनवर सांगितलं.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मदतीनं पीडित मुलीचा पत्ता शोधून काढला. यावेळी स्थानिक पोलीस आजोबांना घेऊन मुलीकडे गेले.यानंतर तिला दोन दिवस प्रवास करून उत्तर प्रदेशातून जळगावात आणलं आहे. घरी आल्यानंतर आजीला पाहून तिनं हंबरडाच फोडला.

थोडक्यात बातम्या-

‘देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली पण…’ निलेश राणे यांच्या आरोपावर उदय सामंतांचं स्पष्टीकरण

चिमुकल्याचे प्राण वाचवणं होतं अशक्य; 16 कोटीच्या इंजेक्शनसाठी विरूष्कासह इतर कलाकारांनीही घेतला पुढाकार

“महागाईचं भांडवल करून सत्तेत आलेल्यांना सामान्य जनतेचा कळवळा उरला नाही”

5 रूपयांचा एक समोसा मग 4 कितीचे?; लहान मुलाच्या निरागस युक्तीवादाचा व्हिडीओ व्हायरल

मुलगी झाली म्हणून विवाहितेसोबत तिच्याच कुटुंबियांनी केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More