बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पप्पा म्हणाले “केसांचा कोंबडा छान दिसतोय”, पाहा प्राजक्ता माळीची वेगळीच हेअरस्टाईल

मुंबई | प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. अशातच आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी त्या मागे एक वेगळं कारण आहे. यावेळी प्राजक्ता तिच्या अजब हेअरस्टाईल मुळे चर्चेत आली आहे. विशेष बाब म्हणजे या केसांच्या स्टाईलवर स्वतः प्राजक्ताच्या वडिलांनी देखील त्याचं मत मांडलं आहे.

प्राजक्ता तिच्या इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असते. तसेच ती तिच्या इन्स्टा अकाऊंटवरुन तिच्या चाहत्यांना अपडेटेड ठेवत असते. अशातच प्राजक्ताने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने एक वेगळीच केसांची स्टाईल केली आहे. यात तिच्या केसांचा वरती आंबाडा बांधला आहे. मात्र पुढे कोंबडा काढण्यात आला आहे.

या पोस्टची विशेष बाब म्हणजे प्राजक्ताच्या फोटोवरील तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं मन वेधून घेतलं आहे. यामध्ये तिने तिचे वडिल तिला कोंबडा छान असल्याचं म्हटलं आहे, असं लिहलं आहे. या फोटोवर तिच्या सर्व चाहत्यांनी भरभरुन प्रेम दाखवत मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, प्राजक्ता केवळ अभिनयामध्येच नाही तर नृत्यामध्ये देखील तितकीच हुशार असून तिने भरतनाट्यममध्ये अरंगेत्रम आणि विशारद देखील पुर्ण केलं आहे. तसेच सध्या तिच्या मनमोहक अदांमुळे अनेक लोकांच्या मनावर राज्य करत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

थोडक्यात बातम्या-

5 मिनिटांत टोचवली दोन वेगळ्या कंपनीची लस; हलगर्जीपणामुळे अशी झाली महिलेची अवस्था

2024 मध्ये मुख्यमंत्री कुणाचा होणार?, प्रफुल्ल पटेल म्हणाले…

“अजित पवारांकडे 10 सेकंद थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे आपण कोरोना संकटावर मात केली”

“निलेश राणे, नितेश राणे काहीच करू शकत नाही, कोणामुळे मोठे झालात हे विसरू नका”

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More