बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बापरे! मानवी वस्तीमध्ये आला ‘हा’ भला मोठा प्राणी…, पाहा व्हिडीओ

कोलकत्ता | काही दिवसांपूर्वी आलेल्या वादळामुळे काही भागांत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे त्या भागातील शेतीचेही बरेचसे नुकसान झाले. तसेच काही भागांत पाऊस जास्त कोसळल्यामुळे पूरही आला होता. त्यामुळे त्या भागत पूराच्या पाण्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे अनेक किडेही आले आहेत.

आपण झाडांवर, खडकाळ जमिनीवर सरडा नावाचा एक प्राणी पाहिला असेल. काही सरडे रंगही बलणारे असतात. परंतू ते दिसायला जरी भितीदायक दिसत असले, तरी ते आपल्याला हानी पोहोचवत नाही. आतापर्यंत आपण हाताच्या तळव्याच्या लांबीचा सरडा पाहिला असेल. परंतू एका ठिकाणी चक्क पूराच्या पाण्यासोबत एक भला मोठा सरडा मानवी वस्तीवर वाहून आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये रहदारीच्या वस्तीवर एक मोठा सरडा रस्त्यावरून चालत आहे. त्या रसत्यावर पूराचे पाणी असून, तो मोठा सरडा त्याच पाण्यातून वाहून आला असल्याचं दिसून येत आहे. सरडा हळू-हळू पुढे चालताना दिसत आहे. एवढा मोठा सरडा पहिल्यांदाच पाहिला असल्यामुळे काही नेटऱ्यांना धक्काच बसला आहे. तर काही नेटकरी चकीतही झाले आहेत.

हा व्हिडीओ ‘एसआरके कोबाटन्ट’ या युजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना ‘बेंगलोर, कोलकत्ता सायक्लोनयास’ असं कॅप्शनही दिलं आहे. तसेच या व्हिडीओला आतापर्यंत 41 हजार लोकांनी पाहिलं असून, अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्सही केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपला हृदयविकाराचा झटका

पक्षाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत- चंद्रकांत पाटील

‘मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा’; संभाजीराजेंची पवारांकडे मागणी

फोन वरुन ओळख, लाॅजवर भेट अन् नंतर घडला धक्कादायक प्रकार

नेहरूंच्या स्मृतीदिनी वाजपेयींचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटलांचा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More