महाराष्ट्र मुंबई

कांदा निर्यात बंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार- दादा भुसे

मुंबई | कांदा निर्यात बंदीचा केंद्राचा निर्णय म्हणजे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची खरमरीत प्रतिक्रिया कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. ते ‘लोकमत’शी बोलत होते.

राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याच्या मिळालेल्या उत्पन्नांतून आता कुठे चांगले पैसे शेतकऱ्यांच्या खिशात पडत असताना दुर्दैवाने केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घोषित केला. हा निर्णय घोषित केल्यानंतर कांद्याचे भाव एक हजार ते दीड हजार रुपयांनी गडगडले, असं दादा भुसे यांनी म्हटलंय.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी विनंती करण्यात आल्याचं दादा भुसेंनी सांगितलं आहे.

केंद्राने जर ऐकलं नाहीतर शेतकऱ्यांना आधी मिळणारा दर आणि निर्यात बंदी च्या घोषणेनंतर मिळणाऱ्या दरात जो नुकसानीचा फरक असेल त्या फरकाचा मोबदला केंद्राने शेतकऱ्यांना दिला पाहिजे अशी माझी मागणी असल्याचं भुसेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“राजभवनाचं सध्या आरएसएस शाखा किंवा भाजप कार्यालय म्हणून नामकरण करावं का?”

शरद पवारांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी- खासदार संभाजीराजे़

‘महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करावी’; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जया बच्चन यांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…

अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची पसंती ऑनलाईनलाच!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या