बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मित्रांचा दुरावा नियतीला देखील अमान्य; तोंड न पाहण्याची शपथ विसरुन मित्राचा जीव वाचवला

नांदेड | एक आठवड्यापुर्वी माळेगाव येथील संभाजीनगर जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई तावरे आणि त्यांचे पती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असताना मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही. अशातच रविराज यांची सावली, दादा जराड यांनी तोंड न पाहण्याची शपथ विसरुन आपल्या मित्राचा जीव वाचवला आहे.

2015 साली माळेगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक, पुणे जिल्हा परिषदेची 2017 साली झालेली निवडणूक असो नाही तर कुठलीही निवडणूक म्हणा, रविराज यांच्या प्रत्येक सुखात दु:खात सावली प्रमाणे दादा जराड असायचे. मात्र त्यांच्या मैत्रीमध्ये काही वैचारिक मतभेद झाल्याने ही जोडी साधारण तीन वर्षांपासून वेगळी झाली आहे. त्यांच्यात मतभेद झाल्यानंतर गावातील अनेक मित्रांनी, गावपुढाऱ्यांनी यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला, तरी दुर्दैवाने एकत्र येऊ शकले नाहीत.

रविराज आपल्या पत्नीसोबत वडापाव नेण्यासाठी आले असताना त्यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार करण्यात आला. यावेळी गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील अनेकजण गोळा झाले. परंतु, कोणीही तत्परतेने मदत न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली. अशावेळी दादा जराड यांनी काही मित्रांसोबत रविराज यांना त्यांच्या पत्नीसोबत बारामती येथे दवाखान्यात दाखल केले.

दरम्यान, ज्यावेळी रविराज यांच्यावर हल्ला झाला, त्याक्षणी माझ्यातील मित्र जागा झाला असल्याचं दादा म्हणाले आहेत. एवढंच नाही तर मी आणि माझ्या मित्र परिवाराने कसलाही वेळ न दवडता सर्वप्रथम दवाखान्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला, जीवघेणा हल्ला झाल्यानंतर आज माझ्या मित्राचा पुनर्जन्म झाला आहे. माझे आयुष्य सार्थकी लागल्याने मी परमेश्वराचे आभारी असल्याचं देखील दादा म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

जात पंचायतीचा जाच संपणार कधी?; बहिष्कार टाकल्यानं 7 बहिणींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा

मुळशीतील रासायनिक कंपनीत पुन्हा एकदा आगीचा थरार; आज सकाळी पुन्हा आग भडकली

“मोठया पवारांकडून पत्र चोरत असताना अजित पवारांसोबत भाजपचे कोण कोण लोक होते?”

आनंदाची बातमी! गेल्या 24 तासात ‘या’ शहरात एकही कोरोना बळी नाही, दिवसभरात फक्त 15 नवे रुग्ण आढळले

‘या’ शहरातील 45 वर्षांच्या पुढील नागरिकांचं घरीच होणार लसीकरण; मोहीम राबवण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More