बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना नगरसेवकाची दादागिरी; तरूणाला लोखंडी राॅडने मारहाण

अंबरनाथ | काही दिवसांपूर्वी पोलिस मित्र बाहेर पडणाऱ्या लोकांवर विनाकारण हात उचलत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर पोलिस मित्रांना पोलिसांनी सक्त तंबी दिली होती. पोलिस रस्त्यावर असताना देखील लोक कामानिमित्त बाहेर पडताना दिसत आहेत. आता एक धक्कादायक प्रकार उल्हासनगर महापलिकेत घडला आहे. रात्री बाहेर पडणाऱ्या एका तरूणाला शिवसेना नगरसेवकाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

रवी जयसिंघानी नावाचा तरुण जुना अंबरनाथ गाव परिसरातील धर्माजी पाटील कॉलनी या भागात राहतो. रात्री सव्वा बाराच्या दरम्यान रवी आपल्या घराबाहेर एकटा फिरत होता. याच वेळी शिवसेना नगरसेवक आकाश पाटील त्याठिकणी होते. त्यावेळी त्याच्यासोबत त्याठिकाणी यश आणि मनिष नावाचे त्याचे दोन साथीदार देखील त्याठिकाणी उपस्थित होते. शिवसेना नगरसेवकाने ‘तू बाहेर का फिरतोय?’ असा सवाल केला.

त्यानंतर लगेच नगरसेवकाने कमरेचा पट्टा काढून रवीला मारहाण करण्यास सुरवात केली. आकाश पाटील यांच्या साथीदारांनी देखील रवीला जबर मारहाण केली. त्या दोघांनी रवीला पोटावर आणि छातीवर राॅडने मारलं. त्याचबरोबर पायावर देखील राॅडचे वार केले. या मारहाणीनंतर रवीच्या शरिरावर काळे निळे डाग उमटले आहेत. त्यानंतर त्याला खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, रवीने अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांना झालेल्या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शिवसेना नगरसेवक आकाश पाटील, यश पाटील आणि मनीष यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या 324,504 आणि 506 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप नगरसेवकाला अटक करण्यात आली नाही.

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकारकडून दिलेल्या वेळेची मर्यादा आज संपुष्टात; ‘या’ समाज माध्यमांवर कारवाई होणार?

‘यास’ चक्रिवादळाचा ट्रेलर, ताशी 150 कि.मी वेगानं धडकण्याची शक्यता ; पाहा व्हिडीओ

कोरोनाची लस जगात सर्वात आधी घेणाऱ्या ‘विल्यम शेक्सपिअर’चा मृत्यू

माहेरी जाताना नवऱ्याला बाईक थांबवायला सांगितली, त्यानंतर तिने जे केलं त्याने सर्वच हादरले

खळबळजनक! शौचालयासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेवर गँगरेप, खांबाला लटकवलं अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More