बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!

नवी दिल्ली | सिनेसृष्टीतल महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जात. यंदा सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. रजनीकांत यांचा 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. महानायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे, असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

रजनीकांत यांनी आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. रजनीकांत यांचे जगात अनेक चाहते आहेत. तसेच रजनीकांत यांनी त्यांच्या अभिनयय कारकिर्दीची सुरूवात नाटकांमधून केली होती.

दरम्यान, रजनीकांत यांनी तामिळ, मल्याळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधून सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. रजनीकांत यांच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळते.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

कर्नाटकात भाजपला मोठा धक्का; ‘ऑपरेशन लोटस’ची चौकशी होणार

आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार- तृप्ती देसाई

“शिवसेना मी घराघरात पोहोचवली, मीच स्वत: राजीनामा देणार होते”

“पवार साहेबांच्या तब्येतीसंदर्भात विकृत पोस्ट करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

उद्धव ठाकरेंना फोन करून नरेंद्र मोदींनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More