बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देवा, घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरव…’; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेशची भावूक पोस्ट

मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची आज 76 वी जयंती आहे. विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि बाॅलिवूडचा अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. वेगवेगळ्या आठवणी तो नेहमी शेअर करत असतो. तसेच तो नेहमी सोशल मीडियामधून त्याच्या वडिलांच्या आठवणीला उजाळा देत असतो.

आज विलासराव देशमुख यांची जयंती असल्यानं रितेश देशमुख यांनं एक ट्विट केलं. त्यात त्यानं त्याच्या लहानपणीचा फोटो शेअर केला. त्या फोटोत रितेश देशमुख आणि विलासराव देशमुख दिसत आहेत. हे देवा, ते दिवस पुन्हा येऊ देत, पप्पा मला तुमची आठवण येत आहे, असं रितेश देशमुखने म्हटलं आहे. याआधीही विलासराव देशमुख यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त रितेशने एक भावनिक व्हिडीओ शेअर केला होता.

रितेश सोबतच त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख हीने सुद्धा ट्विट करत सासऱ्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा, आम्ही तुमची आठवण काढतो. बापलेकीची मिठी जी चिरंतन राहील, असं तिने त्यात लिहिलं आहे. तिने त्याच्या लग्नातील फोटो देखील शेअर केला आहे.

दरम्यान, रितेशचे अनेक चाहते देखील आहेत. अशाच एका चाहत्यानं रितेशला एक अनोख गिफ्ट दिलं आहे. गौरव भाटकर नावाच्या एका कलाकाराने रितेशला एक पेन्टिंग गिफ्ट केली आहे. या पेन्टिंगमध्ये गौरवने विलासराव देशमुख यांचं चित्र रेखाटलं आहे. ते पाहून रितेश भावूक झाल्याचं पहायला मिळालं होतं.

पाहा ट्विट-

 

 

थोडक्यात बातम्या-

बायकोच्या मैत्रीणीच्या प्रेमात आकंठ बुडाला; त्यानंतर त्याने जे पाऊल उचललं ते अत्यंत धक्कादायक!

राज्यासाठी हे मुख्यमंत्री लायक नाहीत- नारायण राणे

तरुणांचा धिंगाणा सहन न झाल्याने एकाची हत्या; अहमदनगरमधील धक्कादायक घटना

कडक सॅल्यूट! पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानाची पत्नी झाली लेफ्टनंट

केंद्र सरकारकडून दिलेल्या वेळेची मर्यादा आज संपुष्टात; ‘या’ समाज माध्यमांवर कारवाई होणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More