बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अर्जुना तया नाव दान, जे का अंजनाचे निधान! दगडूशेठला तब्बल ‘इतक्या’ किलो सोन्याचा मुकूट अर्पण

मुंबई | आजपासून राज्यभरात गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. अनेक दिवसांपासून आपल्या गणरायाच्या आगमनाची वाट पहात होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सार्वजनिक उत्सावांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही भाविकांची आपल्या बाप्पावरची श्रद्धा कायम असल्याचं दिसतंय.

प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने गणपती बाप्पाला काहीतरी अर्पण करण्याचा प्रयत्न करत असतो. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला एका भाविकाने चक्क 10 किलो सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. आता या मुकूटाची चर्चा संपुर्ण राज्यात होत आहे. मात्र, श्रीमंत हलवाई सार्वजानिक गणपती ट्रस्टकडून मुकूट अर्पण करणाऱ्या भाविकाचं नाव गुपित ठेवण्यात आलं आहे.

आज गणेश चतुर्थींनिमित्त 10 किलो सोन्याचा मुकूट एका भाविकाकडून श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आला. या सोन्याच्या मुकूटाची किंमत तब्बल 6 कोटींच्या घरात आहे. 2021 हे दगडूशेठ गणपती स्थापनेपासूनच 129 वं वर्ष आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना झाल्यानंतर हा 10 किलो सोन्याचा मुकूट सकाळी बाप्पाला घालण्यात आला आहे.

दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन भाविकांना मंदिराच्या बाहेरुन घेता येत आहे. गणेश उत्सवामुळे दरवर्षी गर्दी होत असते. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहा दिवस महाराष्ट्रात अनेक निर्बंध घातलेले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“राज्यात भाजपचं सरकार यावं ही गणरायाची इच्छा, बाप्पा ती लवकरच पूर्ण करतील”

काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन दुसरं असूच शकत नाही- देवेंद्र फडणवीस

इंग्लंडचा रडीचा डाव! भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात पुन्हा नवा ट्विस्ट

औषधांची ड्रोनद्वारे होम डिलव्हरी करणारं देशातील ठरणार ‘हे’ पहिले राज्य!

राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार; अण्णा हजारेंचा आंदोलनाचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More