पालघर महाराष्ट्र

शिक्षकानं स्वतःचं चित्र काढून त्यावर टाकली मृत्यूची तारीख; त्यानंतर जे घडलं ते ऐकून धक्का बसेल!

डहाणू | चित्रकलेत पारंगत असणाऱ्या एका शिक्षकानं स्वतःच रेखीव चित्र काढलं. या चित्रावर चक्क ठळक अक्षरात मृत्यूची दिनांक लिहली. आपल्या या फोटोला हार घालून शेवटी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. डहाणू तालुक्यातील निंबापुर महालवाडा परिसरात ही धक्कादायक अन पुरती हादरून सोडणारी घटना घडली आहे.

गंगाराम रमेश चौधरी असं या चित्रकलेत पारंगत असलेल्या शिक्षकांची नाव आहे. गंगारामची पत्नी काही कारणास्तव आपल्या माहेरी निघून गेली होती. तेव्हापासून गंगाराम यांच्या स्वभावात बराच बदल झाला होता. मानसिक तणावातून शेवटी बुधवारी (१५ जुलै) त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

गंगाराम यांना वारली चित्रकलेत विशेष प्राविण्य होतं. ८ जूनला त्यांनी आपलं स्वतःच एक सुंदर चित्र तयार केलं. या चित्रावर १५ जुलै अशी त्यांनी आपली मृत्यूची तारीख असल्याचं लिहीलं. या चित्राला हार घालून त्याचे मोबाईलवर फोटो काढले. आपल्या सर्व नातेवाईकांना व्हाॅट्सअपवर फोटो पाठवत त्यांनी शेवटी गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, गंगारामच्या घरातील सर्व मंडळी घटना घडण्याच्या वेळेस शेतात भातलावणीसाठी गेले होते. गंगारामच्या भितीदायक आत्महत्या करण्याच्या या घटनेनं निंबापुर महालवाडा परिसरात शोकाकुल वातावरण पसरलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अशोक गेहलोतांचा मास्टरस्ट्रोक; राजस्थानच्या राजकारणात नवा ट्वि

राष्ट्रवादीला धक्का, सानेकाकांनंतर आणखी एका कर्तबगार नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू!

अरे बापरे… कोरोनाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड, गेल्या 24 तासांत नोंद झाला सर्वाधिक आकडा!

तरुणाच्या गुप्तांगावर लोखंडी गजाने वार; धक्कादायक घटनेनं बीड हादरलं!

…म्हणून लोक तहसीलदारालाच मारायला धावले; कोविड केअर सेंटरमधील नागरिकांवर गुन्हा दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या