मराठी पाट्यांचा आग्रह धरणाऱ्या मनसेला पोलिसांची नोटीस

मुंबई | मराठी पाट्यांचा आग्रह धरणाऱ्या दहीसरमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावलीय. मनसेचा पूर्वनियोजित कार्यक्रम पुढे ढकला, अशी सूचना या नोटीसमध्ये करण्यात आलीय. 

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत मराठी पाट्यांचं आंदोलन पुन्हा हाती घेण्याची घोषणा केली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून यासंदर्भात कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. 

दहीसरमध्येही मराठी पाट्या लावण्यासाठी दुकानदारांना निवेदन देण्यात येणार होतं. मात्र पोलिसांनी यासाठी परवानगी नाकारत हा कार्यक्रम पुढे ढकलण्यास सांगितलं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं कारण यासाठी देण्यात आलंय.