Dajisaheb Rohidas Patil | धुळ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री,दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचं आज 27 सप्टेंबररोजी निधन झालं. आज सकाळी 11 वाजता त्यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राजकीय वर्तुळातून दुःख व्यक्त केलं जात आहे. (Dajisaheb Rohidas Patil)
रोहिदास पाटील यांच्या पश्चात पुत्र आमदार कुणाल पाटील, विनय पाटील असा परिवार आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात आयसीयुत दाखल करण्यात आले होते. त्यांची फुफ्फुसं कमी क्षमतेनं काम करत असल्याचं निदान झालं होतं.
दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचं निधन
उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. मात्र, नंतर पुन्हा त्यांची तब्येत बिघडली. अखेर आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे अंतिम संस्कार 28 सप्टेंबररोजी धुळ्यातील देवपूर येथील त्यांच्या गावी केले जाईल. एस.एस.व्ही.पी.एस कॉलेज ग्राउंडवर त्यांचे अंतिम संस्कार केले जातील.(Dajisaheb Rohidas Patil)
नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील सुंदर सावित्री सभागृहात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी काँग्रेसच्या काळात विविध खात्याचे पद भूषवले होते. अक्कलपाडा धरण बांधण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता.
आज सकाळी 11 वाजता रोहिदास पाटील यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कॉंग्रेसचे सच्चे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. (Dajisaheb Rohidas Patil)
News Title – Dajisaheb Rohidas Patil passed away
महत्त्वाच्या बातम्या-
उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड!
शेतकऱ्यांनो PM किसान योजनेचा 18 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार!
…तर या मुद्द्यावरून पुण्याचं राजकारण तापलं! विरोधी पक्षाने दिला ‘हा’ इशारा
अबब! सोनं पोहोचलं 80 हजारांवर?, दरवाढीचे तोडले रेकॉर्ड
‘बदला पुरा’; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी फडणवीसांचं रोखठोक भाष्य!