बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘स्टेनगन’ थंडावली! चांगल्या-चांगल्या फलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवणारा डेल स्टेन निवृत्त

मुंबई |  ‘स्टेनगन’ या नावाने प्रसिद्ध असणारा दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकटमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत स्टेनने मंगळवारी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांला जबरदस्त धक्का बसला आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकच्या आधीच निवृत्तीची घोषणा जाहीर केल्याने सगळीकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्ये स्टेनने 635 विकेट घेतल्या आहेत. यात कसोटीत 435, एकदिवसीय सामन्यांमध्ये 196  तर गोलंदाजीचा भेदक मारा करत टी-20 सामन्यामध्ये 64 फलंदाजांना माघारी धाडले होते. स्टेनने ट्विटवर निवृत्तीची घोषणा करत आपल्या टीममधील खेळाडू, चाहते, कुटुंब आणि पत्रकारांचे आभार मानले आहेत.

इंग्लंडविरूद्ध पोर्ट एलिझाबेथ या मैदानावर स्टेनने 2004 साली कसोटी सामन्यात पदार्पण केलं होतं.  2004 ते 2005 या दरम्यान स्टेन फक्त 3 कसोटी खेळला होता. तर 2008 च्या साली 13 कसोटी सामने खेळून आक्रमक गोलंदाजी करून तब्बल 74 विकेट घेतल्या होत्या.  डेल स्टेन हा जागतिक कसोटी क्रमावारीत 2 हजार 343 दिवस नंबर एकवर राहण्याचा विक्रम केला आहे. तो विश्वविक्रमही त्याच्या नावावर आहे.

दरम्यान,  दक्षिण आफ्रिकेच्या स्ट्रीटवाईस पुसस्कारने डेल स्टेनला सन्मानित करण्यात आलं आहे.  कसोची क्रिकेटमधील तो दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. तसेच स्टेन आयपीएलमध्ये भारतात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघाकडून खेळत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

ख्रिस्तियानो रोनाल्डोची घरवापसी, दोन वर्षाच्या कराराची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

‘…अन्यथा कडक निर्बंध लावावे लागतील’; एकनाथ शिंदेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मांस, दारू विक्रीबाबत मथुरेमध्ये आदित्यनाथांनी घेतला मोठा निर्णय!

येत्या निवडणुकांबाबत हसन मुश्रीफांचं मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ

मराठवाड्यात पावसाने पोलीस स्टेशनला बनवलं तलाव, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More