बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘IPLमध्ये खेळापेक्षा पैशांवर लक्ष, आयपीएलपेक्षा पीएसएल भारी’; डेल स्टेनचा जावई शोध

मुंबई | जगभर प्रसिद्ध असलेल्या इंडियन प्रीमीयर लीगमध्ये खेळण्यास प्रत्येक खेळाडू उत्साही असतो. आयपीएलमध्ये उत्तम प्रदर्शन करत युवा खेळाडू संघात पदार्पणासाठी इच्छुक असतात. त्याप्रमाणे आयपीएलमध्ये तशाप्रकारचे नावीन्यपुर्ण आणि गुणवान खेळाडू भारतीय संघालाही मिळाले आहोत. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत खेळताना खेळाडू आपलं 100 टक्के देतात.

त्यासोबतच बाहेर देशातील खेळाडूही सहभागी होतात. संघमालक त्यांना योग्य ती बोली लावत आपल्या संघात खेळवतात. मात्र आयपीएलपेक्षा पीएसएल भारी, असं वक्तव्य करत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने जावईशोध लावला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या संघाकडून डेल स्टेन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतो. मात्र त्याने केलेल्या या वक्तव्याने सर्व क्रीडाप्रेमी त्याच्यावर नाराज झाले असून सोशल माध्यमांवर त्याला ट्रोल केलं जात आहे. आयपीएल खेळायला जातो तेव्हा तिकडे एवढी मोठी नावं असतात त्यांच्या कमाईवरच जास्त जोर दिला जातो. या सगळ्यात क्रिकेटला विसरलं जातं. पण तुम्ही पीएसएल किंवा लंका प्रीमियर लीगमध्ये खेळत असाल, तर सगळं लक्ष क्रिकेटवर असल्याचं डेल स्टेनने म्हटलं आहे. डेल स्टेन सध्या पाकिस्तान सुप लीग खेळत असून एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो बोलत होता.

मी अनेक वर्ष पीएसएल खेळत आहे. लोकं माझ्याकडे येतात, तेव्हा फक्त क्रिकेटबाबत बोलतात. मात्र आयपीएलमध्ये  मोसमासाठी किती पैसे मिळाले असं लोकं मला विचारतात. यापासूनच मला लांब राहायचं होतं आणि खेळावर लक्ष केंद्रीत करायचं होतं. आयपीएलमध्ये खेळाडूंची किंमत बाकी सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाची असते, म्हणून आपण आयपीएलमधून माघार घेतल्याचं डेल स्टेन म्हणाला.

 

थोडक्यात बातम्या-

पूजा आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; राठोडांनी पाच कोटी दिल्याचा आरोप केल्यावर लहू चव्हाणांनी उचललं मोठं पाऊल

‘शिवसेना नेत्यांकडून माझ्या जीवाला धोका’, कंगणानं उचललं हे मोठं पाऊल

‘कोहली’ने केला होता तब्बल 2 लाखांचा दारूसाठा, पोलिसांनी धाड टाकल्यावर पितळ पडलं उघडं!

फुलराणीच्या भूमिकेत दिसणार बॉलिवुडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या!

“अर्थसंकल्पात 35 हजार कोटींची तरतूद असताना कोरोनाच्या लसीसाठी 250 रुपये का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More