नवी दिल्ली | अनुसूचित जातीतील व्यक्तींनी धर्मपरिवर्तन करुन इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश केल्यास, ते आरक्षित जागेवरुन निवडणूक लढवू शकणार नाहीत. अशा लोकांना अनुसूचित जातीसाठी मिळणाऱ्या आरक्षणाचाही फायदा मिळू शकणार नसल्याचं, केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे.
अनुसूचित जातीतील दलित बांधव जे हिंदू आणि बौद्ध धर्माला मानतात ते आरक्षित जागेरुन लढू शकतात आणि आरक्षणाचा फायदाही घेऊ शकतात. राज्यसभेमध्ये भाजप पक्षाचे खासदार जीबीएल नरसिंह राव यांनी ‘आरक्षित निवडणूक क्षेत्राची पात्रता’ यावर प्रश्न विचारला होता. त्यावेळी ते बोलत होते.
संविधानामध्ये अनुसूचित जातीबद्दल पॅरा-3 ही विविध राज्यातील अनुसूचित जातीतील यादीनूसार या अंतर्गत एखादा व्यक्ती हिंदू, शीख आणि बौद्ध धर्म व्यतिरिक्त धर्म मानत असेल आणि तो अनुसूचीत जातीचा सदस्य असेल तर त्याला अनुसूचित जातीचा मानला जाणारा नाही.
दरम्यान, सरकार प्रतिनीधी कायदा आणि निवडणूक नियमावली वरती काही संशोधन करण्याच्या विचारात आहे का असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना असा कोणताही प्रस्ताव अद्याप सरकारच्या विचाराधीन नसल्याचंही रविशंकर प्रसाह यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
लाचारी पत्करण्यापेक्षा काँग्रसने सत्तेतून बाहेर पडावं- राधाकृष्ण विखे-पाटील
“…तर मग आम्हाला आमदार राम कदम यांच्यापर्यंत जावं लागेल”
‘या’ प्रसिद्ध मॉडेलची निघृण हत्या, मृतदेहासोबत केलं हे धक्कादायक कृत्य
पूजा चव्हाण प्रकरणी विजय वडेट्टीवार यांचं अजब वक्तव्य, म्हणाले
‘राहुल गांधी यांनी आता लग्न करायला हवं’; केंद्रीय मंत्र्याच्या गांधींना सल्ला