Top News नागपूर महाराष्ट्र

डाॅली की टपरी!!! सोशल मीडियावर आता या चहावाल्याचा जलवा, पाहा व्हिडीओ

Photo Credit- Twitter/@RaveenKr

नागपूर | नागपूर जिल्ह्याचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर संत्री येते. मात्र आता नागपूरचं नाव घेतल्यावर चहा प्रेमींसाठी ‘डॉली की टपरी’ डोळ्यासमोर येत आहे.

‘डॉली की टपरी’ या जागेच्या लोकप्रियतेमागे त्या दुकानाचा मालक डॉली असून त्याच्या हाताची चव त्यासोबतच त्याचा अनोखा स्वॅगसुद्धा आहे. डॉलीचा चहा बनवतानाचा व्हिडीओ एका व्यक्तीने शूट करुऩ तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर केलेला डॉलीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गेल्या 20 वर्षापासून डॉली चहाचं दुकान चालवत आहे. केवळ चहा बनवण्यातच नाही तर ग्राहकांना सिगारेट पेटवून देण्यातही डॉलीची एक वेगळीच शैली आहे. त्याचबरोबर त्याची पैसे-देतानाची स्टाईलही पाहण्यासारखी आहे. डॉली चहाची टपरी सकाळी 6 वाजता उघडतो आणि रात्री 9 वाजता बंद करतो. हा चहा केवळ सात रुपयांमध्ये मिळतो. तसेच पहिल्यांदा चहा पिण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाला डॉली मोफत चहा देता.

दरम्यान, डॉलीच्या अॅटीट्यूड आणि स्टाईलबद्दल विचारल्यावर तो अभिनेता रजनीकांतचा मोठा फॅन आहे. तसेच त्याला दक्षिणात्य चित्रपट पहायला आवडतात.

 

थोडक्यात बातम्य-

पूजा राठोडचा गर्भपात झाला तेथील विभागप्रमुख होते रजेवर, गूढ आणखी वाढलं!

“उन्नाव पीडितेला एअरलिफ्ट करून मुंबईत पाठवा, आम्ही तिला उत्तम उपचार देऊ”

पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

“आराेप सिद्ध हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको”

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना दिलासा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या