बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिंहगडच्या पायथ्याशी हॉटेलमध्ये डान्स पार्टी; पोलिसांनी 11 जणांना शिकवला धडा

पुणे | सिंहगड किल्ला, डोणजे आणि आजुबाजूच्या परिसरात संचारबंदी असताना सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या डान्सपार्टीवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला आहे. मौजे गोळेवाडी गावच्या हद्दीतील हॉटेल सानवी रिसॉटमध्ये ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी हॉटेल चालकासह 11 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात एक प्रतिष्ठीत डॉक्‍टर पळून गेला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्त घालत असताना, त्यांना सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका लॉजवर पार्टी सुरु असल्याची खबर मिळाली. त्यानूसार हॉटेल मालक विनय सुभाष कांबळे आणि त्याचा मित्र डॉ. निखील भाकरे हे हॉटेलमध्ये रुम नं. 6 व 7 मध्ये डान्सचा कार्यक्रम आयोजीत करुन गर्दी जमावा जमवाजमव करत आहेत, असं समजलं. यानंतर हॉटेल सानवी रिसॉट या ठिकाणी छापा टाकण्यात आला.

डान्स पार्टीत सहभागी असलेला आणि पार्टीच्या मुख्य सुत्रधारांपैकी एक डॉ. निखिल भाकरे हा पोलीस आल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी सर्वांना पकडून हवेली पोलीस ठाण्यात आणलं. त्यांच्याविरुद्ध कोरोना नियमाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

ट्रॅक्टर घेऊन राहुल गांधींची संसदेत एंट्री; कृषी कायद्याविरोधात काँग्रेस आक्रमक

…ती महिला माझ्या मुलीसारखी होती- भास्कर जाधव

“भास्कर जाधवांचा अरेरावीचा प्रकार मालकाला खूश करण्यासाठी”

मोठी बातमी! कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केली राजीनाम्याची घोषणा

बॉसने दरडावल्याने तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More