बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डान्सर राघव जुयाल कोरोनाग्रस्तांची करतोय मदत, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

मुंबई | देशाच्या विविध भागात कोरोनानं हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांवर परिणाम होत आहे. या संकट काळात अनेकजण आपापल्या परीनं मदत करत असल्याचं दिसून येत आहे. अशातच डान्सर राघव जुयाल आपल्या मित्रांच्या सोबतीनं दिवस रात्र कोरोना काळात मदत करत आहे.

देशाच्या विविध भागात कोरोनाने हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राघव आणि त्याचे सहकारी ऑक्सीजन कंसन्ट्रेटर उपलब्ध करुन देण्याचे काम करत आहे. कोरोना काळातही त्याचे कार्य पाहून चाहते त्याचं भरभरुन कौतुक करत आहेत.

इतरांनाही या कठिण प्रसंगी जमेल तितकी मदत करण्याचं आवाहनही राघवनं केलं आहे. एकमेकांना मदत करत राहा, कठिण काळात एकमेकांना आधार द्या असंही तो प्रत्येकाला आवाहन करतोय.

दरम्यान, राघव जुयाल हा डान्स इंडिया डान्स या लोकप्रिय डान्स शोचा लोकप्रिय स्पर्धक होता. त्यानंतर अनोख्या नृत्यशैलीनं त्यानं आपलं वेगळे स्थान निर्माण करत चाहत्यांच्या मनात घर बनवलं. राघव जुयाल सध्या ‘डान्स दिवाने 3’ शोला होस्ट करत आहे. ‘डान्स दिवाने 3’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत असते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Raghav Juyal (@raghavjuyal)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Raghav Juyal (@raghavjuyal)

थोडक्यात बातम्या – 

‘मलायका तरीही तू म्हातारीच दिसतेस’; ‘त्या’ व्हिडीओमुळे मलायका सोशल मीडियावर ट्रोल

कडक सॅल्युट! पोलिसांनी जखमी महिलेला 4 किलोमीटर झोळीमध्ये उचलून नेत वाचवले प्राण

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन अभिनेत्रींचं नाव आल्यानं सिनेसृष्टीत खळबळ

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

सकारात्मक बातमी! जन्मताच आईचं छत्र हरपलेल्या नवजात बालकाने 19 दिवसात केली कोरोनावर मात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More