बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इथे मृत्यूही ओशाळला… एका पाठोपाठ एक मृतदेह, विद्युतदाहिन्याची धुरांडी वितळली!

सुरत | गुजरातमधील व्यापाराचे मुख्य केंद्र असलेल्या सुरतमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये. मृतांची संख्या प्रचंड असल्याने सुरतच्या स्मशानभूमींमध्ये मृतांवर 24 तास अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

गेल्या आठ-दहा दिवसांपासून स्मशाभूमींमध्ये अहारोत्र मृतदेह जळत आहेत. अश्विनीकुमार आणि रामनाथ घेला या दोन स्मशानभूमींमध्ये मृतदेहांचा ओघ जास्त आहे. जवळपास 16 विद्युतदाहिन्यांमध्ये दररोज 100 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याची माहिती येथील प्रशासनाने दिली. तसेच स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर इतका ताण आला आहे की चितांच्या उष्णतेमुळे विद्युतदाहिन्यांची धुरांडीही वितळली आहेत.

सध्याच्या घडीला स्मशानभूमीत दिवसाला 80 मृतदेह येत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीतील सर्व विद्युतदाहिन्या धगधगत्या राहत आहेत. आम्ही थोडाथोडावेळाने प्रत्येक विद्युतदाहिनीचा वापर करत असलो तरी मृतदेहांची संख्याच इतकी जास्त आहे की, या विद्युतदाहिन्या सतत सुरु आहेत. त्यामुळेच या विद्युतदाहिन्यांच्या चिमण्या उष्णतेने वितळल्याची माहिती रामनाथ गेल्हा स्मशानभूमीतील अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्या अविरत काम करत असल्याने त्यांच्यात बिघाड व्हायला सुरुवात झाली आहे. हे चित्र असंच राहिलं तर आता गुजरातमध्ये कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन होण्याची शक्य वर्तवली जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पानं पुसली’; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

“पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय”

रमजानसाठी सरकारकडून मार्गदर्शक सुचना जारी; वाचा काय आहेत निर्बंध

“करेक्ट कार्यक्रम हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो, हा शब्द नेमका कुणाचा हे सर्वांना माहितीये”

‘ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन’; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्याना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More