बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणे यांच्या अटकेनंतर शिवसैनिकांनी साजरी केली दिवाळी; पाहा व्हिडीओ

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर कालपासूनच नारायण राणे यांच्या अटकेची मागणी होत होती. त्यानंतर आता नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर सेना आणि नारायण राणे यांच्यातला वाद शिगेला पोहोचला आहे. त्यानंतर आता शिवसेनेने फटाके फोडत जल्लोष साजरा केला आहे.

नारायण राणे यांना अटक होताच मुंबईतील कुलाब्यात शिवसैनिकांनी जोरदार फटाके फोडून जल्लोष केला आहे. शिवसेना शाखेसमोर भर रस्त्यात फटाके फोडत शिवसेना कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यानंतर आता हा वाद आणखी मोठा होण्याची शक्यता आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, महाड आणि इतर शहरात देखील शिवसेनेने सकाळपासून आक्रमक भूमिका घेत आंदोलने केली होती. तर जुहू आणि रत्नागिरीत सेना आणि राणे समर्थक एकमेकांना भिडले होते. त्यानंतर नारायण राणे यांना अटक होईल हे निश्चित झालं होतं. आता अटक झाल्यानंतर आता शिवसैनिक आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

दरम्यान, नारायण राणे यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्य़ा अन्य शहरातही भाजपने आंदोलन करत आहेत. नारायण राणे यांनी तात्काळ सुटका करावी, अशी मागणी भाजप कार्यकर्ते करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

वरूण सरदेसाई यांची पोलिसांना शिवीगाळ???; व्हिडीओ ट्विट करत मनसेचा गंभीर आरोप

“एक मिनिट साहेब जेवतायेत”; …अन् जेवत्या ताटावरून नारायण राणेंना अटक, पाहा व्हिडीओ

‘फक्त 1 कोटी…’; चाहत्याच्या मागणीवर सोनू सूदचं हटके उत्तर

राणेंच्या विरोधात शिवसैनिकांनी काढला कोंबडी मोर्चा

“तुमच्या घरात घुसून हिशोब चुकता करेल”, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More