बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतासाठी धोक्याचा इशारा, दररोज होऊ शकतो 2320 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाने उद्रेक माजवला आहे. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रशासनासह नागरिकही हैराण झाले आहेत. यासंदर्भात एक नवीन अहवाल समोर आला असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशातील परिस्थिती भयावह असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तब्बल 2 हजार 320 जणांचा मृत्यू दररोज होऊ शकतो, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालामुळे सगळीकडेच खळबळ माजली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दररोज 1750 लोकांचा जीव जाऊ शकतो तर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा आकडा 2320 वर जाणार असल्याचं इंडिया टास्क फोर्स सदस्यांच्या आयोगाच्या अहवालात म्हटलं असून लॅन्सेटमध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

देशात कोरोनामुळे दररोज अनेक बळी जात आहेत तसेच आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात भार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य यंत्रणा कोरोना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून बऱ्याच ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागत आहे.

लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून समोर आलेली माहिती ही सर्वांसाठीच अत्यंत धक्कादायक आहे. पण राजकीय पक्ष मात्र एकमेकांवर टीका टिपणी करण्यात व्यस्त असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत असले तरी इंजेक्शन आणि बेड्स अभावी रूग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

थोडक्यात बातम्या –

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महाराष्ट्र सरकार करणार मेगाभरती

कोरोनामुळे घरीच मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं; महाराष्ट्रातील ‘या’ तीन शहरांमध्ये सर्वाधिक घटना

पुण्यात कोरोनाचा आकडा वाढताच, वाचा आजची आकडेवारी

कोरोनाची लस घेतल्यानंतर सेक्स करावा का?; अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More