बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोकादायक! डेल्टा प्लस व्हेरिएंटचा मुंबईत पहिला बळी

मुंबई | कोरोनाचा प्रभाव कमी होत असतानाच सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटनं धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. आता या डेल्टा प्लस व्हेरिएंचा संसर्ग वाढत असतानाच मुंबईत या विषाणूमुळं पहिला बळी गेला असल्याचं समोर येत आहे.

मुंबईमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटनं घेतलेला पहिला बळी 60 वर्षीय महिलेचा आहे. या महिलेनं कोरोनाच्या दोन्ही लसींचा डोस घेतलेला होता. मात्र तरीही तिचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील डेल्टा प्लसनं झालेला हा पहिला मृत्यू असल्याचंही नोंदवण्यात आलं आहे.

या महिलेला डेल्टा प्लसची लागण तर झालीच होती याशिवाय तिला मधुमेहासह बाकीचेही बरेच आजार असल्याचं समोर आलं. मुंबईत 11 डेल्टा प्लसचे रुग्ण होते, त्यापैकी या 60 वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याआधी जूनमध्ये रत्नागिरीत एका महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला होता. ही महिला संगमेश्वर येथे राहणारी होती. त्यामुळे आता राज्यातील डेल्ट प्लस व्हेरिएंटचा आकडा दोनवर पोहचला आहे.

दरम्यान, भारतातच नव्हे तर ऑस्ट्रेलियासह इतर देशांमध्येही हीच परिस्थिती असल्याचं म्हटलं जात आहे. सर्वाधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोना लढ्याचे स्वरुप बदललं आहे, असं अमेरिकेच्या सीडीसीनं स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘अगर आप करते रहेंगे हाऊस मे दंगा, तो कर देंगे एकदिन आपको नंगा’; आठवलेंचा विरोधकांना काव्यमय इशारा

के. एल राहुलचं दमदार शतक; तब्बल 31 वर्षांनी केला ‘हा’ विक्रम

नाशिकच्या लाचखोर फरार महिला शिक्षणाधिकारी यांची संपत्ती पाहुन तुम्हीही व्हाल थक्क!

दिलासादायक! खाजगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात, ठाकरे सरकारचा महत्वपुर्ण निर्णय

रोहितने इंग्लंडच्या गोलंदाजांचा काढला घामटा, अँडरसनच्या अफलातून चेंडूने शतकापासून ठेवलं दूर; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More