बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खतरनाक! तरूणाने घरी बनवला बॉम्ब, निकामी न करता आल्याने गेला पोलिसांत अन्…

नागपूर | नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने युट्युबवर व्हिडिओ पाहून थेट घरीच गावठी बॉम्ब बनवला आणि त्याचा प्रयत्न देखील यशस्वी झाल्याचं उघडकीस आलं आहे. परंतु, बॉम्ब निकामी न करता आल्याने या तरुणाने एक शक्कल लढवली आणि ती त्याच्या अंगलट आली. नागपुरमधील 25 वर्षीय युवकाने युट्युबवर व्हिडिओ बघून घरच्या घरीच साहित्य आणून गावठी बॉम्ब बनवला. त्यानंतर हा बॉम्ब आपल्याला निकामी करता येणार नाही आणि आता फुटला तर फजिती होईल, या भीतीने या तरुणाने एका पिशवीत हा बॉम्ब टाकून थेट पोलीस स्टेशन गाठलं.

नागपुरमधील पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्याने बनाव करत ही पिशवी मला रस्त्यावर पडलेली आढळली, असं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या पिशवीत पाहिलं असता त्यांना काही वायर व बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली व त्यांनी तात्काळ बॉम्बशोधक व नाशक पथकाला याबाबत माहिती दिली. व तात्काळ पोलिसांचं बॉम्ब पथक दाखल झालं.

दरम्यान, बॉम्ब पथकाने संबंधित बॉम्ब निकामी केला आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात या तरुणाची अधिक चौकशी केली. तसेच पोलिसांना तपासात हा तरुण काहीतरी लपवत असल्याचं निदर्शनास आल्याने त्यांनी या तरुणाची कसून चौकशी केली असता त्यात स्वतः तरुणानेच बाॅम्ब बनवला असल्याचं निष्पन्न झालं.

बॉम्ब निकामी न करता आल्याने त्या तरूणाने हा बनाव केला असल्याचं त्याने पोलिस तपासात कबूल देखील केलं. त्यानंतर, नागपूर पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नागपुरमधील या तरुणाला घरी बॉम्ब बनवणं चांगलंच महागात पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

ब्युटी क्वीनने प्रेमाचं नाटक करत बनवला पॉर्न व्हिडीओ त्यानंतर केलं हे घृणास्पद कृत्य

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून रामदास आठवले यांची भन्नाट कविता

“नाना पटोलेंना मुख्यमंत्री, तर राहुल गांधींना पंतप्रधान व्हावसं वाटतंय, पण…”

बाबो! ‘या’ माॅडेलने फक्त बेडशीट गुंडाळून केला फोटोशूट, पाहा तिचे बोल्ड फोटो

‘या’ जिल्ह्याची तिसऱ्या टप्प्यातून थेट पहिल्या टप्प्यात गरुडभरारी; उद्या सर्वकाही उघडणार

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More