प्रेमभंग झालेल्या महिला क्रिकेटपटूचं विराट-अनुष्काला ट्विट

मुंबई | भारताचा कर्णधार विराट कोहलीला 3 वर्षांपूर्वी ट्विटरवरुन प्रपोज करणाऱ्या डॅनियलनं विराट-अनुष्काला ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्यात. मात्र तिच्या या एका शब्दाच्या ट्विटची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा आहे. 

डॅनियल वेट इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करते. तिला विराट एवढा आवडला होता की तिने त्याला सरळ ट्विटरवरुन प्रपोज केलं होतं. त्यानंतर विराटनं तिची भेटही घेतली होती. या भेटीत विराटनं आपली बॅट तिला भेट दिली होती.

दरम्यान, विराट-अनुष्काच्या लग्नानंतर डॅनियल पुन्हा प्रसिद्धीझोतात आली आहे. लाईफ गोज ऑन नावाच्या ट्विटवर तिने हसून दुःख लपवलं आहे.