बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुमच्यात हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच पण त्याआधी…’; शिवसेना मंत्र्यांचं भाजपला आव्हान

मुंबई | भाजप राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. आता शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय.

भाजपनं सरकार पाडून दाखवावं पण त्याआधी सरकार कोरोना संकटात प्रयत्न करत असताना स्वत: किती पुढाकार घेतला त्याचा विचार विरोधकांनी करावा, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सरकार पडणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. एकीकडे कोरोनासारखं संकट असताना दुसरीकडे अशा चर्चा केल्या जात आहेत. अशा प्रकारच्या वावड्या म्हणजे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. संकटाच्या काळात एकाग्रतेनं काम करणाऱ्यांना विचलित करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे, असा आरोप गुलाबराव पाटलांनी केलाय.

कोरोनाचं संकट संपल्यावर मैदानात येऊया. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर सरकार पाडाच, असं आव्हान गुलाबराव पाटलांनी भाजप नेत्यांना दिलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

फडणवीसजी, महाराष्ट्रापेक्षा गुजरातची अवस्था बिकट आहे- जयंत पाटील

…म्हणून रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुलट सोडल्या- अनिल परब

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट; आज आढळले इतके रुग्ण

“एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण, करुन दाखवा रडून नको”

मराठी युवकांकडे कौशल्य नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना जयंत पाटलांचं सडेतोड प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More