बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज साहेब माझं काय चुकलं?”, पुण्यापाठोपाठ औरंगाबाद मनसेमधील अस्वस्थता उघड

औरंगाबाद | फायरब्रँड नेत्या म्हणून ओळख निर्माण केलेल्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला रामराम ठोकला. रूपाली पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर औरंगाबाद मनसेमधील अस्वस्थता देखील समोर आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या औरंगाबाद दौऱ्यापूर्वी औरंगाबादमधील कार्यकारणीत तडकाफडकी बदल करत औरंगाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे (Suhas Dashrathe) यांना जिल्हाध्यक्ष पदावरून काढून टाकलं. जिल्हाध्यक्ष पदावरून अचानक उचलबांगडी झाल्यावर दाशरथे यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना त्यांची अस्वस्थता बोलून दाखवली आहे.

राज साहेब माझं काय चुकलं? असा सवाल दाशरथे यांनी राज ठाकरेंना केला आहे. ‘मी काम करतोय, पक्ष संघटना बांधणीसाठी काम करतोय, कालच्या दौऱ्यातही स्वागतापासून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी झटलो. पण माझं काय चुकलं हा मोठा प्रश्न मनात आहे’. असं दाशरथे म्हणाले.

दरम्यान, ‘राज ठाकरेंनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती निष्ठेने पार पाडायला तयार आहे. मी पुन्हा महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करायला, झेंडे बांधायला, सतरंज्या टाकायला तयार आहे. फक्त हे का घडलं, याचं स्पष्टीकरण मला पाहिजे’, अशी मागणी दाशरथे यांनी राज ठाकरेंकडे केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘शीना बोरा जिवंत, काश्मीरमध्ये तपास करा’; इंद्राणी मुखर्जींच्या दाव्याने देश हादरलं

अंकिता लोखंडेला पतीने लग्नात दिलं खास गिफ्ट; किंमत ऐकून थक्क व्हाल

Gold Silver Price: सोने चांदीचे भाव पुन्हा वधारले; वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे दर

जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…

“मुस्लिमांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही तर ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होणार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More