‘दशक्रिया’ या मराठी सिनेमाला ब्राह्मण समाजाचा विरोध

पुणे | पद्मावती सिनेमाला होणारा विरोध तीव्र असतानाच आता ‘दशक्रिया’ हा मराठी सिनेमा वादात सापडलाय. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने या सिनेमाला जोरदार विरोध केलाय. 

शुक्रवारी 17 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मात्र या सिनेमात ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याचा ब्राह्मण महासंघाचा आरोप आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करु, असा इशाराही देण्यात आलाय.

दरम्यान, या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून 64 वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालाय.